गजकर्ण, किंवा कसल्याही Skin Infection होईल गायब फक्त करा हा साधा उपाय | Gachkaran Upay In Marathi

 Gachkaran Upay In Marathi : फक्त या दोन घटकांचा वापर करून गजकर्ण घरगुती उपाय किंवा कसल्याही प्रकारचा स्किन इन्फेक्शन संपूर्ण नष्ट करा.

Gachkaran Upay In Marathi

तर मित्रांनो  सर्वांना माहित आहे आता उन्हाळा हा ऋतू ला सुरू झाला आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये घाम यायला सुरुवात होते.

आणि शरीरातून येणाऱ्या घामामध्ये काही बॅक्टेरिया असतात त्यामुळे आपल्या स्किनवर गजकर्ण किंवा त्यासारखे विविध प्रकाराचे स्किन इन्फेक्शन झालेली दिसून येते. 

 आणि हे स्किन इन्फेक्शन इतके भयानक असते की याच्यामुळे आपल्या शरीरावरती नेहमी खाज सुटायला सुरुवात होते, आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण विविध दवाखान्यांमध्ये याचा इलाज करतो किंवा क्रीमचा उपाय सुरू करतो.

ह्या क्रीम्स मुळे तर आपल्याला काही दिवस आराम झालेले दिसून येते परंतु क्रीम आणि गोळ्या खाणे बंद केले तर त्या ठिकाणी परत जशास तसे हे गजकर्ण किंवा इन्फेक्शन आपल्याला दिसून यायला सुरुवात होते.

तर मित्रांनो आपण या स्किन इन्फेक्शन ला सहजरित्या घरच्या घरी अगदी दोन घटकाचा उपयोग करून याला नष्ट करू शकतो, तर आज या पोस्टमध्ये त्या उपाया बाबत जाणून घेणार आहोत.

त्या अगोदर हे जाणून घ्या की गजकर्ण होऊ नये यासाठी कुठली गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. 

गजकर्ण होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?

१. आपले कपडे हे नेहमी स्वच्छ धुतलेले पाहिजे 

२. रोज नियमित आंघोळ करावी 

३. एखाद्या ठिकाणी इन्फेक्शन झाला असेल तर तिथे हात         लावू नये. 

४. डॉक्टरांच्या किंवा वैद्याच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही           औषधाचा उपयोग करू नये. 

गजकर्णवर उपाय काय करावा? 

तर मित्रांनो उपाय हा खूप सोपा आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 

१. सोडा ( खायचा)

२. बदाम तेल 

 तर मित्रांनो हे दोन घटक आपल्याला घ्यायचे आहेत सर्वप्रथम अर्धा चमचा सोडा घ्यायचा आहे, आता या सोडा मध्ये बदाम तेलाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला चांगले एकजीव करून घ्यायचा आहे त्याची एक पेस्ट तयार झाल्या सारखी दिसून येईल.

आता ही जी पेस्ट तयार झालेली आहे हिला ज्या ठिकाणी गजकर्ण झाला असेल किंवा फंगल इन्फेक्शन झाला असेल, चेहऱ्यावरती काळे डाग, वांग झाले असेल त्या ठिकाणी लावायचा आहे.

हे लावल्यानंतर आपल्याला त्याला तसेच राहू द्यायचा आहे ते 15 ते 20 मिनिटानंतर आपोआप सुकून जाईल, आणि हा उपाय रोज संध्याकाळी झोपत असताना आपल्याला करायचा आहे याच्यामुळे आपल्याला रात्रभर हे व्यवस्थित रित्या सुकून जायला मदत होईल. 

 तर मित्रांनो इतका सोपा उपाय आहे नक्कीच करून पहा आणि जर कोणाला गजकर्ण किंवा स्किन इन्फेक्शन झालेला असेल तर नक्कीच त्यांनाही पोस्ट शेअर करा. 

आणि अशाच नवनवीन माहिती करिता आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.

      !! धन्यवाद !! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense